साजनी (अहिराणी कविता)

तुनी मन्ही प्रेम कहानी दुन्याम्हा गाजनी
मी तुन्हा साजना , तु मन्ही साजनी

तुन्हा बिगर मरनं से मुश्कील
तुन्हा बिगर मुश्किल से जीनं
जवय जवय सुवास लेस मी 
तवय तवय तुन्ह नाव मी लीनं
तुन्हा नावनी दिलम्हा धून वाजनी
मी तुन्हा साजना तू मन्ही साजनी

मी दिवाना व्हयनू तुन्हा प्रेमम्हा 
अमर प्रेमना इतिहास करी जासू
तुलें देखीसन मन्ह पोटभरी जास
रडता रडता तुले देखीनी येस हासू

डोयाभरी माले देखीसन तु कशी लाजनी
मी तुन्हा साजना तू मन्हीं साजनी

✍️ मोहन पाटील कवळीथकर





Comments